पाणीपुरी ची पुरी – मराठी रेसिपी
व्हिडिओ आपल्या मराठी भाषे मध्ये, मी मराठी :
Marathi Recipe Video – Perfect कुरकुरीत पाणीपुरी ची पुरी बनवा घराचा घरी सहज पण बाजारा सारखी
साहित्य :
- १/२ कप जाड रवा
- २ चमचे मैदा
- १/४ कप गरम पाणी
- तेल – पुरी तळण्यासाठी
कार्यपद्धती :
- १/२ कप जाड रवा घ्या आणि त्यात २ चमचे मैद्याचे पीठ घाला आणि चांगले मिसळा.
- पाणी घ्या, उकळवा आणि मिश्रणात १/४ कप (पाव कप) गरम पाणी घाला.
- ते मिश्रण चांगले एकत्र करून 4 ते 5 मिनिटे छान पैकी मळून घ्या.
- मळलेले कणिक अर्ध्या तासासाठी (३० मिनिटासाठी ) झाकुन ठेवा.
- 30 मिनिटानंतर परत १ ते २ मिनिटे कणिक मळून घ्या आणि 50 ते 55 लहान कणकेचे गोळे बनवा.
- मैद्याचे पीठ लहान लहान बनवलेल्या कणकेच्या गोळ्यांवर पसरवा.
- कणकेचा एक गोळा घ्या आणि साधारणता 5 सेमी व्यासाची पुरी लाटा.
- सर्व पुऱ्या लाटुन घ्या आणि त्या १० ते १२ मिनिटांसाठी पसरून ठेवा.
- १० मिनिटांनंतर पुऱ्या कडकडीत गरम तेलात टाळून घ्या.
- पुऱ्या तळताना प्रत्येक पुरी तेलात चमच्याने दाबा जेणेकरून ती नीट फुलेल.
आता छान पुऱ्या तयार आहेत, पाणीपुरी बनवुन खाण्यासाठी..
Facebook Page : Cooking Recipes 4 U Marathi
YouTube Channel Page : CookingRecipes4U Marathi
Squeaks Video Channel Page : Cooking_Recipes_4_U_Marathi